Friday, 1 September 2017

जिल्हाधिकारी कार्यालयातील चतुर्थश्रेणी कर्मचा-यांचा सत्कार



         जळगाव, दि.1- सन 2017-18 या आर्थिक वर्षात उत्कृष्ट काम केल्याबद्दल मा. ना. श्री. चंद्रकांत (दादा) पाटील, महसूल तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा व मा. किशोर राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी जळगाव, मा. राहूल मुंडके, निवासी उपजिल्हाधिकारी, मा. अभिजित भांडे, उपजिल्हाधिकारी (महसूल प्रशासन) जळगाव यांनी 9 शिपाई कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. त्यांचर नावे या प्रमाणे.
          श्री. कैलास सोनवणे, श्रीमती अनिता कुमावत, श्री. अन्वर बेग, श्री. महेश जोशी, श्री. युनूस खान, श्री. यशवंत सोनवणे, श्री. उध्दव नन्नवरे, श्री. देशमुख, श्री. पंढरीनाथ कोळी, श्री. सचिन मोहिते यांना सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला.
       जळगाव जिल्हा महसूल चतुर्थ कर्मचारी संघटनेच्या वतीनले त्या नऊ शिपाई कर्मचारी यांचे अभिनंदन करण्यात आले. त्याबाबत इतर शिपाई यांनी देखील असे चांगले काम केल्यास त्यांना पुढील वर्षी असाच गौरव केला जाईल असे संघटनेतर्फे आवाहन करण्यात आले आहे.
०००००

No comments:

Post a Comment