जळगाव,दि.15-
राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन विभागाचे मंत्री ना. जयकुमार रावल हे रविवार 17
सप्टेंबर 2017 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
रविवार
दि.17 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वा 30 मि.नी. अमृतसर एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्टेशन
येथे आगमन व शासकीय/खाजगी वाहनाने अजिंठा शासकीय विश्रामगृह जळगावकडे प्रयाण.
सकाळी 6 वा. 40 मि.नी अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 9
वा. 45 मि.नी. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथून शासकीय/खाजगी वाहनाने सुनसगाव
ता. भुसावळ जि. जळगावकडे प्रयाण. सकाळी 10 वा. 15 मि.नी. सुनसगाव ता. भुसावळ, जि.
जळगाव येथे आगमन व श्री. प्रल्हाद ठाकूर यांच्या 75 व्या अमृत महोत्सव कार्यक्रमास
उपस्थिती. (स्थळ :- दादासाहेब दामु पांडू पाटील माध्यमिक विद्यालय, सुनसगाव ता. भुसावळ जि. जळगाव). दुपारी 12 वा. 15 मि.नी.
सुनसगाव ता. भुसावळ जि. जळगाव येथून शासकीय/खाजगी वाहनाने भुसावळकडे प्रयाण. दुपारी
12 वा. 45 वा. भुसावळ येथे आगमन व नगरसेवक मा. श्री. नबी यांच्या मुलाच्या लग्न
समारंभास उपस्थिती. (स्थळ :- आदित्य लॉन्स, राजस्थान मार्बल जवळ, वांजोळा रोड,
नॅशनल हायवे नं. 6 भुसावळ), दुपारी 1 वा. 15 मि.नी. भुसावळ येथून शासकीय, खाजगी
वाहनाने औरंगाबाद विमानतळाकडे प्रयाण.
No comments:
Post a Comment