Saturday, 2 September 2017

बकरी ईद निमित्त मुस्लीम बांधवांना प्रशासनाच्यावतीने शुभेच्छा



            जळगाव, दि: 2 - मुस्लीम बांधवाचा पवित्र सण बकरी ईद (ईद उल झुहा) निमित्त आज जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर आणि जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांनी येथील ईदगाह मैदानावर जाऊन प्रशासनाच्यावतीने मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
            आज सकाळी नऊ वाजता येथील ईदगाह मैदानावरील बकरी ईद ची नमाज संपल्यानंतर त्यांनी मैदानात जाऊन मुस्लीम धर्मगुरु तसेच बांधवांना भेटून ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळेही त्यांच्यासोबत होते.   
                                        00000

No comments:

Post a Comment