जळगाव,
दि. 12 -प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत सर्वांसाठी घरे-2022 च्या जिल्हा पातळीवरील
उद्दष्टिपूतीचीप्रभावी अंमलबजावणी करण्याकरीता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन
भवनात शुक्रवार 13 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते सांयकाळी पाच वाजेपर्यंत एकदिवसीय
कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासन अधिकारी (नगरपालिका)
यांनी दिली आहे.
कार्यशाळेचे
उद्घाटन सकाळी 11.00 वाजता जळगावचे खासदारए. टी. नाना पाटील, रावेरच्या खासदार
श्रीमती रक्षाताई खडसे व जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते होणार
आहे. या कार्यशाळेस हुडकोच्या उप महाव्यवस्थापक श्रीमती वैजयंती महाबळे, म्हाडाचे
अधिक्षक अभियंता दिलीप मुगळीकर हे मार्गदर्शन करणार आहे.
कार्यशाळेस
अंमलबजावणी यंत्रणाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन
अधिकारी (नगरपालिका) यांनी केले आहे.
000
No comments:
Post a Comment