जळगाव, दि. 31 - शासनाने सन 2017-18 या खरीप पणन हंगामात ज्वारी, मका, बाजरी हे भरडधान्य आधारभुत किंमत योजनेतंर्गत खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यात एकुण 19 ठिकाणी भरडधान्य खरेदी केंद्र मंजुर केले आहे. या केंद्रामार्फत चालु हंगामात शासनाच्यावतीने 1 नोव्हेंबर पासून भरडधान्य खरेदी सुरु करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिली आहे.
या धान्य खरेदी केंद्रावर ज्वारी, मका, बाजरी या भरडधान्याची खरेदी करण्यात येणार असून ज्वारी (संकरीत) 1 हजार 700 रुपये प्रति क्विटल, ज्वारी (मालदांडी) प्रती क्विंटल 1 हजार 725 रुपये, मका 1 हजार 425 रुपये प्रति क्विंटल, तर बाजरी 1 हजार 425 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे दर निश्चित करण्यात आला आहे. सर्व साधारण गुणवत्ता दर्जाचेच (एफ.ए.क्यु.) धान्य या खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांनी याच दर्जाचे धान्य खरेदी केंद्रावर आणावे.
भरडधान्य (ज्वारी, बाजरी, मका) हे 1 नोव्हेंबर, 2017 ते 31 डिसेंबर, 2017 या कालावधीत तालुकास्तरावर केंद्रनिहाय खरेदी करण्यात येणार आहे. जिल्हयात जळगाव, अमळनेर, चाळीसगाव, रावेर, बोदवड, भुसावळ, मुक्ताईनगर, चोपडा, पारोळा, एरंडोल, धरणगाव, पाचोरा, भडगाव येथे प्रत्येकी एक तर जामनेर तालुक्यात जामनेर व शेंदुर्णी येथे दोन असे एकूण 15 खरेदी केंद्र तर महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ मर्या, नंदुरबार यांच्या अभिकर्ता संस्थेतील आदिवासी भागात यावल - 1, रावेर- 1, चोपडा-2 असे एकूण चार याप्रमाणे जिल्ह्यात 19 खरेदीसाठी केंद्र स्थापित करण्यात आलेले आहे. हे खरेदी केंद्र प्रत्येक तालुक्यातील शेतकी सहकारी संघ लि.येथे व बोदवड को. ऑप. सेल परचेस युनि. लि. तसेच शेंदुर्णी सह खरेदी विक्री जिल्हा प्रोसेसिंग सोसायटी लि. येथे त्याचबरोबर यावल येथे हरीपुरा संस्थेचे, रावेर येथे पाल टीडीसी, चोपडा येथे कर्जाणा संस्थेचे व सत्रासेन संस्थेचे येथे सुरु करण्यात येणार आहे.
अधिक तपशिलासाठी संबंधित खरेदी केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले आहे.
०००००

No comments:
Post a Comment