Friday, 13 October 2017

जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री. चंद्रकांत पाटील यांचा जिल्हा दौरा


     जळगाव, दि. 13 :- राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम मंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. चंद्रकांत पाटील हे रविवार दि. 15 ऑक्टोबर 2017 रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
            रविवार दि. 15 ऑक्टोबर 2017 रोजी अमृतसर एक्सप्रेसने सकाळी 6 वा. 20 मि.नी. जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व वाहनाने शासकीय विश्रामगृह जळगावकडे प्रयाण. सकाळी 6 वा.40 मि.नी. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 9 वा. 45 मि.नी.  जळगाव जनता बँकेच्या नवीन शाखेचे उद्घाटन समारंभास उपस्थिती. (स्थळ :- पांडे डेअरी चौक, जिल्हा पेठ, जळगाव), सकाळी 10 वा. 45 मि.नी. गणपती मंडळांना बक्षिस वितरण समारंभास उपस्थिती. (स्थळ :- पोलीस मंगलम हॉल, जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाजवळ, जळगाव), सकाळी 11 वा. 45 मि.नी. जिल्हा परिषद शिक्षक दिन पुरस्कार वितरण समारंभास उपस्थिती. (स्थळ :- गंधे सभागृह, ला. ना. हायस्कूल, जळगाव), दुपारी 1 वा. 45 मि.नी. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. दुपारी 3 वा. जिल्हा पातळीवर कृषी पंपासाठी अतिरिक्त विज पुरवठा करणेसंदर्भात गठीत समितीच्या बैठकीस उपस्थिती. (स्थळ :- अजिंठा शासकीय विश्रमागृह, जळगाव), दुपारी 4 वा. जळगाव येथील 18 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. कार्यालयाच्या नुतन इमारतीचे लोकार्पणासाठी उपस्थिती. (स्थळ :- महाबळ कॉलनी, जळगाव), सायं. 4 वा. 30 मि.नी. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. रात्री 9 वा. 15 मि.नी. शासकीय विश्रामगृह येथून वाहनाने जळगाव रेल्वे स्थानकाकडे प्रयाण. रात्री 9 वा. 45 मि.नी. जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व आझाद हिंद एक्सप्रेसने पुणेकडे प्रयाण.
000000

No comments:

Post a Comment