Tuesday, 10 October 2017

हातमाग विणकरांसाठी बुनकर मित्र हेल्पलाईन सुरु



         जळगाव, दि. 10 -  केंद्र शासनाने हातमाग विणकरांचे हित जोपासण्यासाठी व त्यांना सर्वोतपरी मदत करण्यासाठी तसेच त्यांना शासकीय योजनांची सर्वंकष माहिती देण्यासाठी बुनकर मित्र या नावाने हेल्प लाईन सुरु केली आहे. या हेल्पलाईनचा क्र. 18002089988 असा असून ही सेवा मोफत देण्यात येत असल्याची माहिती प्रादेशिक उपसंचालक वस्त्रोद्योग, मुंबई यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
            महाराष्ट्र राज्यात शेती नंतर रोजगार देणारा व्यवसाय हा वस्त्रोद्योग आहे. राज्यात हातमागावर काम करणा-या विणकरांसाठी राज्य शासन व केंद्र शासन विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. राज्यात हातमाग विणकराने विणलेला माल थेट ग्राहकांपर्यत पोहचून जास्तीत जास्त नफा प्रत्यक्ष विणकरास मिळण्यासाठी केंद्र शासनाने www.indiahandmadebazaar.com या नावाने स्वतंत्र पोर्टल सुरु केले आहे. या पोर्टलव्दारे हातमाग विणकरांना त्यांच्या उत्पादनाचा तपशील, उत्पादनाचा फोटो आदि माहिती अपलोड करुन नवनवीन बाजारपेठ काबिज करण्यास मदत होणार आहे. अधिक माहितीसाठी प्रादेशिक उपसंचालक, वस्त्रोद्योग मुंबई, 7 वा मजला, चरई, टेलिफोन एक्सचेंज बिल्डींग, मावळी मंडळ रोड,  ठाणे (पश्चिम) 400601 तसेच Email - rddtextiles३mumbai@rediffmail.com  दुरध्वनी क्रमांक - 022-25405363 वर संपर्क साधावा.              
                                                                      ०००००

No comments:

Post a Comment