Tuesday, 24 October 2017

ग्रामपंचायत निवडणूक मतदान व मतमोजणी काळात मद्यविक्री बंद



      जळगाव, दि. 24 - जिल्हयात 27 ऑक्टोबर रोजी 23 ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत आहे. या  निवडणूका शांततेत पार पडाव्यात तसेच याठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. याकरीता संबंधित ठिकाणची मद्य व ताडी विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिले आहे.
            निवडणूक कार्यक्षेत्रातील सर्व मद्य व ताडी विक्रीची दुकाने 26 ऑक्टोबर (मतदानाचा अगोदरचा पूर्ण दिवस), 27 ऑक्टोबर (मतदान संपेपर्यंत) आणि 28 ऑक्टोबर (मतमोजणी संपेपर्यंत) रोजी बंद राहतील. या बंदीचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी दिला आहे.
            जिल्ह्यातील जळगाव तालुका- देऊळवाडे, एरंडोल तालुका - रवंजे खु, दापोरी, अंतुर्ली खु., अमळनेर तालुका- चोपडाई, कोंढावळ, खापरखेडा प्र.डा. अंबोरे, डांगर बु, जैतपीर, ब्राम्हणे, मुंगसे, भडगाव तालुका - अंतुर्ली, आडळसे, रावेर तालुका- जानोरी, मुक्ताईनगर तालुका - उचंदे, कु-हा, चोपडा तालुका - वटार, जामनेर तालुका - सोनारी, मालदभाडी, चाळीसगाव तालुका - हिंगोणेसिम, दरेगाव, मेहुणबारे, धरणगाव तालुका- वाघळूद खु.  या ग्रामपंचायतींसाठी 27 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान होणार असून मतमोजणी 28 ऑक्टोबर 2017 रोजी होणार आहे.

No comments:

Post a Comment