जळगाव, दि. 2 - महाराष्ट्र राज्य समाजकल्याण बोर्डाचे पुनर्गठण करुन बोर्डावर अध्यक्ष व राज्य शासनाने नामनिर्देशित केलेले 10 अशासकीय सदस्य यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. सामाजिक कार्याचा अनुभव असलेल्या व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणा-या महिलांनी त्यांचे अर्ज, वैयक्तिक माहिती, सामाजिक कार्याचा अनुभव व फोटोसहित परिपूर्ण प्रस्ताव चार प्रतीत 15 नोव्हेंबर च्या आत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाकडे पाठवावेत. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.
बोर्डावर नियुक्ती करण्याकरीता केंद्रीय समाज कल्याण बोर्डाकडून सामाजिक कार्य केलेल्या 3 महिला उमेदवारांची व सामाजिक क्षेत्रातील कार्यरत 10 कार्यकर्त्यांची वैयक्तीक माहिती मागविण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, आकाशवाणी चौक, जळगाव (०२५७-२२२८८२८) या कार्यालयाशी संपर्क साधवा.
०००००

No comments:
Post a Comment