जळगाव, दि. 12 - महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत
प्रतीवर्षी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वित आहे. यामध्ये
राज्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू, साहसी उपक्रम, दिव्यांग खेळाडूंसह,
संघटक/कार्यकर्ते, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, महिला मार्गदर्शक व संघटक /
कार्यकर्ती यांचेसाठी जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार तसेच जेष्ठ क्रीडा
महर्षीकरीता शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार व
अन्य क्रीडा पुरस्कारासाठीचा सुधारीत नियमावलीत उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शकांच्या
खेळ प्रकारमध्ये स्क्वॅश व अश्वारोहण (हॉर्स रायडींग) या खेळांचा समावेश करण्यात
आलेला आहे. उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शकांच्या गुण कोष्टकामध्ये 19 वर्षाखालील
गटाच्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेतील पदक प्राप्त खेळाडू/ राष्ट्रीय महिला
क्रीडा स्पर्धाचा समावेश करण्यात आलेला आहे. म्नॅस्टीक्स
क्रीडा प्रकारमध्ये आर्टीस्टिक्स जिम्नॅस्टीक्स या उप क्रीडा प्रकारासाठी 2 वर्ष व
तदनंतर रिदमिक जिम्नॅस्टीक्स/ एरोबिक जिम्नॅस्टीक्स /ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टीक्स/
ट्रॅम्पोलिन व टंबलिंग या उप क्रीडा प्रकारासाठी 1 वर्ष या क्रमाने चक्राकार
पध्दतीने पुरस्कार देण्यात येईल. एखादा क्रीडा प्रकारामध्ये पुरस्कारासाठी पात्र
खेळाडू उपलब्ध झाला नाही तर सदरचा पुरस्कार अन्य ऑलिंपिक खेळामध्ये समाविष्ट
असलेल्या खेळाच्या उपप्रकारामध्ये सर्वोत्तम कामगिरी केलेल्या खेळाडूस आयुक्त,
क्रीडा यांचे स्तरावरील छाननी/शिफारास समितीने केलेल्या शिफारशी विचारात घेऊन
पुरस्कार देण्याचे अधिकार राज्यस्तरीय पुरस्कार निवड समितीस राहणार आहे. खेळाडूंच्या गुण कोष्टकामध्ये शालेय
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा (19 वर्षाखालील) राष्ट्रीय महिला क्रीडा स्पर्धाचा
समावेश करण्यात आलेला आहे. दिव्यांग खेळाडूंच्या खेळ प्रकारामध्ये बॅडमिंटन या
खेळाचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे शिवछत्रपती पुरस्कारासाठी अर्ज
करण्याची मुदत 9 डिसेंबर ऐवजी 15 डिसेंबर 2017 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
सन 2014-15, सन 2015-16, सन 2016-17 या वर्षासाठीच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा
पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज 15 डिसेंबर 2017 पर्यंत अर्जदाराने www.mumbaidivsports.com या वेबसाईटवर उपलब्ध करुन दिलेल्या link वर
सादर करावा. ऑनलाईन भरण्यात आलेल्या अर्जाची व अपलोड करण्यात आलेल्या कागदपत्रांची
एक प्रत डाऊनलोड करुन स्वाक्षांकित करुन संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या
कार्यालयात 16 डिसेंबर 2017 पूर्वी सादर करावे. असे आवाहन श्री. नरेंद्र सोपल,
प्र. आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी केलेले
आहे.
०००००
No comments:
Post a Comment