Wednesday, 20 December 2017

शहरात आज कौशल्य विकास व रोजगार मेळाव्याचे आयोजन



        जळगाव, दि. 20 - दिनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, जळगाव शहर महानगरपालिका आणि जिल्हा कौशल्य रोजगार उद्योजकता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 21 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 10 वाजता बालगंधर्व खुले नाटयगृह येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
            या मेळाव्याचे उद्घाटन महापौर ललित कोल्हे यांचे हस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त्‍ किशोर राजे निंबाळकर हे राहणार असून  प्रमूख अतिथी म्हणून अप्पर आयुक्त राजेश कानडे, उप महापौर गणेशभाऊ सोनवणे, स्थायी समितीच्या सभापती श्रीमती ज्योतीताई इंगळे, महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती प्रतिभाताई कापसे उपस्थित राहणार आहे.
            या मेळाव्यास जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगारांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन श्रीमती अनिसा तडवी, सहाय्यक संचालक, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र, चंद्रकांत खोसे, उपायुक्त, म.न.पा. जळगाव, श्री. लक्ष्मीकांत कहार, उपायुक्त तथा शहर प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.
            अधिक माहितीसाठी कु. गायत्री पाटील, सहायक प्रकल्प अधिकारी, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान व संदीप भोसले, व्यवस्थापक, कौशल्य विकास व उपजिविका यांचेशी संपर्क साधवा.
०००

No comments:

Post a Comment