Friday, 22 December 2017

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा



        जळगाव, दि. 22 - राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा शनिवार 23 डिसेंबर, 2017 रोजीचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
शनिवार 23 डिसेंबर रोजी सकाळी 6 वा. शेगांव, जि. बुलढाणा येथून शासकीय वाहनाने जळगावकडे प्रयाण. सकाळी 9 वा. जळगव येथे आगमन. सकाळी 9 ते 10 वा. 15 मि. नी. जळगाव (अजिंठा) विश्रामगृह येथे राखीव. सकाळी 10 वा. 30 मि.नी. कृषी उत्पन्न बाजार समिती, जळगाव येथील उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11 वा. जळगाव तालुक्यातील विविध गांवाना भेटी. दुपारी 2 वा. 30 मि.नी. जळगाव विमानतळ येथे आगमन व उडान अंतर्गत जळगाव-मुंबई विमानसेवा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 3 वा. जळगाव, धरणगाव तालुक्यातील विविध गांवाना भेटी. साईनुसार पाळधी, ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.
०००००

No comments:

Post a Comment