जळगाव, दि. 20 - हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लि. मुंबई ने रावेर व यावल तालुक्यातील 98 शाळांमध्ये 188 शौचालये बांधण्यासाठी 3.29 कोटी रुपये उपलब्ध करुन दिले आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज दिली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानास प्रतिसाद तसेच रावेर, यावल या आदिवासी तालुक्यातील मुलांना शालेय जीवनापासूनच स्वच्छतेची सवय लागावी. यासाठी हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लि. मुंबई ने या तालुक्यातील शाळांमध्ये शौचालये बांधण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत आज मुंबई येथे एचपीसीएलचे महाव्यवस्थापक झाकीर मोल्ला व जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्यात करार झाला.
रावेर व यावल तालुक्यातील ज्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या जास्त आहे. अशा 98 शाळांची निवड शौचालये बांधण्यासाठी करण्यात येणार आहे. तसेच लवकरच शौचालयांचे बांधकाम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी दिली.
000

No comments:
Post a Comment