जळगाव, दि. २० - रमाई आवास योजनेतंर्गत आतापर्यंत जिल्ह्याला १३ हजार ७६३ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आलेले असून जिल्ह्यात ९ हजार ५३८ घरकुलांना मंजूरी प्राप्त झाली आहे. त्यापैकी ७ हजार २४० घरकुले पूर्ण झाली आहे. तर १ हजार ९५९ घरकुलांचे काम प्रगतीपथावर आहे. याकरीता ५३ कोटी ३५ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यातील विविध यंत्रणामार्फत खर्च करण्यात आला आहे.
जिल्हा सामाजिक विकास शक्ती प्रदत्त समितीची सभा निवासी उप जिल्हाधिकारी श्री. राहूल मुंडके यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. सहायक आयुक्त, समाज कल्याण खुशाल गायकवाड, जिल्हा सरकारी वकील ॲङ केतन ढाके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबीता कमलापूरकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जयकर आदिंसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त खुशाल गायकवाड यांनी ही माहिती दिली.
अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासनाच्यावतीने देण्यात येणारी शिष्यवृत्तीची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी संबंधित महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांचे अर्ज तातडीने प्राप्त करुन घ्यावे. तसेच समाजकल्याण विभागाने नियमानुसार आवश्यक ती सर्व कार्यवाही तातडीने पूर्ण करुन विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्याची सुचना निवासी उप जिल्हाधिकारी श्री. मुंडके यांनी दिल्यात.
या बैठकीत शासकीय वसतीगृह, निवासी शाळा, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना आधारकार्डचे वाटप, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, शिष्यवृत्ती वाटप, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, रमाई आवास योजना, अनुसूचित जाती उपयोजनांचा आढावा घेण्यात आला.
शासकीय वसतीगृह, निवासी शाळा, आश्रमशाळेतील 17 हजार 248 विद्यार्थ्यांना आधारकार्डचे वाटप करण्यात आले आहे. तर अनिवासी आश्रमशाळेतील 334 विद्यार्थ्यांचे आधारकार्ड प्रलंबित आहे. तसेच शासकीय वसतीगृहातील 548 विद्यार्थ्यांची दुसऱ्या सत्रातील तर 8 आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करणे प्रलंबित असल्याची माहिती श्री. गायकवाड, सहायक आयुक्त यांनी बैठकीत दिली.
000

No comments:
Post a Comment