Wednesday, 21 February 2018

पोस्टाच्या खातेदारांनी आधार व मोबाईल क्रमांक नोंदविण्याचे आवाहन



      जळगाव, दि. 21 - पोस्टातील बचतधारकांना कळविण्यात येते की, पोस्टातील सर्व प्रकारच्या खात्यांना आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक नोंदणी/लिकिंग करण्याचे काम सुरु आहे. सर्व खातेदारांनी आपले आधार कार्ड झेरॉक्स व मोबाईल क्रमांक त्वरित आपले खाते असेलल्या पोस्ट कार्यालयात जमा करावे. असे आवाहन डाक अधीक्षक, जळगाव विभाग, जळगाव यांनी केले आहे.
            सर्व खातेदारांनी 31 मार्च, 2018 च्यापूर्वी आपले आधार कार्ड क्रमांक व मोबाईल क्रमांक लिंकिंग/ नोंदणी करणे आवश्यक आहे असल्याचेही डाक अधीक्षक यांनी कळविले आहे.
०००

No comments:

Post a Comment