Wednesday, 14 February 2018

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी समुपदेशकांची नियुक्ती



      जळगाव, दि. 14 - माहे फेब्रुवारी व मार्च, 2018 मध्ये होणा-या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षा तणावमुक्त व्हाव्यात. यादृष्टीने परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना ताणतणावांचे व्यवस्थापन व समस्यांचे, शंकांचे निरसन करणेसाठी तसेच विद्यार्थी व पालक यांना यथायोग्य मार्गदर्शन मिळणेकरीता विभागीय मंडळामार्फत जिल्हानिहाय समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
         ज्या विद्यार्थी व पालकांना परीक्षेसंदर्भात काही ताणतणाव, समस्या असल्यास त्यांनी समुपदेशकांकडे संपर्क साधल्यास त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले जाईल. नियुक्त करण्यांत आलेल्या समुपदेशकांची जिल्हानिहाय नावे व भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहे.
           नाशिक जिल्हा - श्री. बावा किरण रामगीर मोबाईल क्रमांक -9423184141/9423026302, धुळे जिल्हा- श्री. पाटील शांताराम धुडकू, मोबाईल क्रमांक-9421537323/9421422956, जळगाव जिल्हा-श्री. महाजन दयानंद रघुनाथ मोबाईल क्रमांक-7768082105 तर नंदुरबार जिल्ह्यासाठी श्री. माळी राजेंद्र सुकदेव मोबाईल क्रमांक-9423194212 असा आहे. ही सुविधा 21 फेब्रुवारी, 2018 ते 24 मार्च, 2018 पर्यंत सुरु राहणार आहे याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. असे आवाहन आर. आर. मारवाडी, विभागीय सचिव,  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक विभागीय मंडळ, नाशिक यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००

No comments:

Post a Comment