जळगाव, दि. 14 - जळगाव, भुसावळ, बोदवड,
यावल, रावेर, मुक्ताईनगर या तालुक्यात कापूस, सोयाबिन, तुर हे पिक मोठ्या प्रमाणात
घेतले जाते. शासनाने या पिकांचे सर्वेक्षण
करण्यासाठी तालुकास्तरावर किड सर्वेक्षक व किड नियंत्रक यांची नेमणूक केली आहे.
सद्यस्थितीत हरभरा पिकावर किडींचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे.
हरभरा पिकाचे घाटे अळीच्या
नियंत्रणासाठी, हरभरा पिकाचे घाटेअळीच्या प्रदुर्भावासाठी निरीक्षण करावे. शेतात
प्रती हेक्टरी 50 पक्षी थांबे उभारावेत. गरज भासल्यास 5% निंबोळी अर्काची किंवा
एचए.एन.पी.व्ही @ 500 मिली + एक चमचा नीळ प्रती हेक्टर फवारणी करावी. मर रोगाची
प्राथमिक लक्षणे दिसत असल्यास अशी झाडे उपटून नष्ट करावीत.
घाटे
अळीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टिन बेन्झोंएट 5 एस जी 4 ग्रॅम 10 लीटर पाण्यात
मिसळून फवारावे. हरभा-यावरील घाटे अळीच्या प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या
जवळ दिसत आहे, प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर गेल्यास नियंत्रणासाठी
इमामेक्टिन बेन्झोंएट 5 एस जी 4 ग्रॅम 10 लीटर पाण्यात मिसळून फवारावे. असे आवाहन
उप विभागीय कृषि अधिकारी गोरक्ष लोखंडे यांनी केले आहे.
०००
No comments:
Post a Comment