जळगाव, दि. 1 - जिल्ह्यात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी मुद्रा बँक योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगारांना बॅकांनी कर्ज उपलब्ध करुन द्यावे. तसेच त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले.
मुद्रा बँक प्रचार, प्रसार व समन्वय समितीची जिल्हास्तरीय आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी दिनेश वाघ, समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, कौशल्य विकास विभागाच्या सहायक संचालक श्रीमती अनिसा तडवी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक साहेबराव पाटील, जिल्हा अग्रणी बँकेचे सहायक व्यवस्थापक राजन भावसार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे एस. आर. अडसुळ, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सी. पी. राणे, अशासकीय सदस्य सागर धनाड, श्याम अग्रवाल, श्रीमती सुलोचना पाटील आदि उपस्थित होते.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यातील जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार व नवउद्योजकांनी रोजगाराकडे व स्वयंरोजगाराकडे वळावे, त्यांना आर्थिक मदत व्हावी याकरीता मुद्रा बँक योजनेतंर्गत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या योजनेची माहिती जिल्ह्यातील नागरीकांना होण्यासाठी जिल्हा समन्वय समितीच्यावतीने चित्ररथ, आकाशवाणी, रेल्वे स्थानक, बस स्टॅन्ड, बसेसवर आदि ठिकाणी होर्डिग्ज, बॅनर, झिंगल्सच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात प्रसिध्दी मोहिम राबविण्यात येत आहे. त्यानुसार बेरोजगार युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध होण्यासाठी बँकांनीही नियमानुसार अधिकाधिक गरजूंना कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
मुद्रा बँक योजनेतंर्गत शिशु गटासाठी 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. त्यानुसार जिल्ह्यात या गटात 1 लाख 48 हजार 653 लाभार्थ्यांना 370 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. तर किशोर गटासाठी 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. या गटात 4 हजार 747 लाभार्थ्यांना 70 कोटी रुपये कर्ज वाटप करण्यात आले आहे. तसेच तरुण गटासाठी 10 लाख रुपयांपर्यत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. त्यानुसार या गटात 810 लाभार्थ्यांना 62 कोटी रुपयांचे असे जिल्ह्यात एकूण 1 लाख 54 हजार 210 लाभार्थ्यांना 515 कोटी 54 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले असून 502 कोटी 69 लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे सहायक व्यवस्थापक श्री. भावसार यांनी बैठकीत दिली.
000

No comments:
Post a Comment