Tuesday, 24 April 2018

महसुली उद्दिष्ट 100 टक्के पुर्ण करणाऱ्या मुद्रांक अधिकाऱ्यांचा आज महसुलमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात होणार सन्मान

     जळगाव, दि. 24 - आर्थिक वर्षे 2017-18 या कालावधीत 100 टक्के महसुली उद्ष्टि पूर्ण केलेल्या जिल्ह्यातील सह जिल्हा निंबधक वर्ग-1 श्री. आर. एल. पाटील, सहदुय्यक निंबधक वर्ग-2, सर्वश्री सुनिल एम. पाटील, जी. जी. पिंगळे, आर. एम. कडाळे यांचा राज्याचे महसुल मंत्री ना.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज (25 एप्रिल रोजी ) पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात सन्मान करण्यात येणार आहे.
     सहदुय्यक निंबधक वर्ग-2, श्री सुनिल एम. पाटील यांनी उद्दिष्टाच्या 231 टक्के इतका, सहदुय्यक निंबधक वर्ग-2, श्री जी. जी. पिंगळे यांनी उद्दिष्टाच्या 118 टक्के, सह जिल्हा निंबधक वर्ग-1 श्री. आर. एल. पाटील यांनी 111 टक्के तर सहदुय्यक निंबधक वर्ग-2, श्री आर. एम. कडाळे यांनी उद्दिष्टाच्या 109 टक्के महसुली उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
                                                                        0  0  0

No comments:

Post a Comment