Monday, 2 April 2018

जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी प्रवेशपत्र 7 एप्रिलपर्यंत मिळणार

              जळगाव, दि. 2 - जवाहर नवोदय विद्यालयात इ. सहावीच्या प्रवेशासाठी नियोजित निवड चाचणी परिक्षा शनिवार 21 एप्रिल 2018 रोजी जिल्हयातील प्रत्येक तालुका केंद्रावर होणार आहे. त्याकरिता ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत त्यांचे प्रवेशपत्र सेतू सुविधा केंद्रातून (सीएससी सेंटर) डाऊनलोड करावेत व ज्यांनी ऑफलाईन अर्ज केले आहेत त्यांच्या मुख्याध्यापकांकडे (गट शिक्षणाधिकारीमार्फत) पाठविले जाणार असल्याची माहिती नवोदय विद्यालयाचे प्राचार्य श्री. वे. नारायणा राव यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.
           त्याचबरोबर प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयाच्या कार्यालयातूनही प्राप्त करता येणार आहे.  विद्यार्थ्यांना त्यांचे प्रवेशपत्र 7 एप्रिल, 2018 पर्यंत मिळणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क दूरध्वनी- 02582/222132, मोबाईल क्र. 7507997089/9404900916 वर संपर्क साधावा.
                                                                    ०००

No comments:

Post a Comment