Tuesday, 26 June 2018

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती साठी अर्ज करण्याचे आवाहन


            जळगाव, दि.26सन 2017-18 या शैक्षणिक वर्षात 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमामध्ये विदयार्थ्यांना सरासरी 60% किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारीने गुण प्राप्त करुन उत्तीर्ण झालेल्या मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विदयार्थ्यी विदयार्थीनी यांना महामंडळाकडून ज्येष्ठता व गुण क्रमांकानुसार उपलब्ध निधीच्या अधीन राहुन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजुर करण्यात येते दिनांक 10 जुलै 2018 च्या आत संपुर्ण कागदपत्रानिशी जिल्हा कार्यालयात संपर्क करावा.
      अर्जासोबत पुढील मुळ कागदपत्रे दोन प्रतीसहित आणावीत.
मार्कशीट, शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, पुढच्या वर्गात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड सर्टिफिकिटसह व जिल्हा व्यवस्थापकांच्या नावे शिष्यवृत्ती मागणीचा अर्ज इत्यादी कागदपत्रांसह  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. जळगाव. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, महाबळ रोड, मायादेवीनगर स्टॉपसमोर, हतनुर कॉलनी, जळगाव. फोन नं. 0257-2263294  असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
०००

No comments:

Post a Comment