Tuesday, 17 July 2018

अनु.जाती व नवबौध्द युवक व युवतीसाठी सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन


        जळगाव, दि.17:- जळगाव जिल्हयातील अनु.जाती व नवबौध्द घटकातील युवक व युवतीसाठी सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण दि. 20 जुलै 2018  पासून  सुरु होणार असुन युवक –युवतींना  हनुमान व्यायाम शाळा अमरावती, येथे प्रशिक्षणासाठी निवड करुन पाठविण्यात येणार आहे. येणार असल्याचे समाज कल्याण विभागाने  कळविले आहे.
  निवड गुरुवार  दि. 19 जुलै 2018 रोजी पोलीस कवायत मैदान, नविन बसस्थानका समोर जळगाव, येथे सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. सदर विद्यार्थ्यांनी येते वेळी जातीचा दाखला, बारावी पास असल्याचे गुणपत्रक, रहिवासी दाखला, दोन पासपोर्ट फोटो, शाळा सोडल्याचा दाखला या सर्वांची छायांकित प्रत सोबत आणावी असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव, यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००

No comments:

Post a Comment