Monday, 6 August 2018

शासकीय संदेश प्रसारण धोरणाचा मसुदा तयार 15 ऑगस्टपर्यंत हरकती, सूचना दाखल करता येणार

            मुंबई, दि. 6 : राज्य शासनाच्या नव्या शासकीय संदेश प्रसारण धोरण- 2018चा मसुदा तयार करण्यात आला असून हरकती व सूचना मागविण्यासाठी www.maharashtra.gov.in आणि www.dgipr.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे.  दि. 15 ऑगस्ट 2018 पर्यंत हरकती व सूचना दाखला करता येऊ शकतील, असे माहिती व जनसंपर्क महासंचालक यांनी कळविले आहे.
            नव्या शासकीय संदेश प्रसारण धोरणाचा मसुदा अंतिम करुन राज्य शासनाच्या मान्यतेसाठी सादर करण्यापूर्वी याबाबत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. कोणास काही हरकत वा सूचना द्यायची असल्यास dgipr.advt1718@gmail.com या ईमेलवर किंवा वरिष्ठ सहायक संचालक (जाहिरात), माहिती व जनसंपर्क महासंचालनाल, महाराष्ट्र शासन, 17 वा मजला, नवीन प्रशासकीय भवन, मंत्रालयासमोर, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई- 400032 या पत्त्यावर  दि. 15 ऑगस्ट 2018 पर्यंत पाठवाव्यात, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
                                                                     000

No comments:

Post a Comment