जळगाव, दि. 3 - अन्न व औषध प्रशासनास
खब-याव्दारे शहरात प्रतिबंधीत अन्नपदार्थाचा साठा विक्रीसाठी येणार असल्याची
माहिती प्राप्त झाली होती. त्याची योग्यरित्या शहानिशा करुन प्रशासनाचे सहाय्यक
आयुक्त (अन्न ) श्री. यो. को. वेंडकुळे व अन्न सुरक्षा अधिकारी, श्री. विवेक पाटील
व अनिल गुजर यांनी सकाळी 8 वाजेच्या सुमारास स्टडियम कॉम्प्लेक्स, विंग सी येथे
काही संशयास्पद सामान आढळून आले.
त्याची तपासणी केली असता त्यामध्ये 18 बॉक्समध्ये केशरयुक्त विमन पानमसालाचे
प्रत्येकी 176 ग्रॅमचे एकूण 1800 पाकीटे आढळून आली. काही वेळाने घटनास्थळी सदर
मालाचा ताबा घेणारी व्यक्ती श्री. राजेंद्र विनायक बाविस्कर हे हजर झाले. त्यांचेकडे
चौकशी केली असता सदरचा माल हा त्यांचे मालकीचा असल्याचे कबूल केले. या मालाची
पाहणी केली असता त्यामध्ये 18 बॉक्समध्ये केशरयुक्त विमल पानमसालाचे प्रत्येकी 176
ग्रॅमचे एकूण 1800 पाकीटे आढळून आली असून या मालाची एकूण किंमत 3लाख 56 हजार 600 इतकी आहे.
सदरचा माल हा महाराष्ट्र राज्यात मा. अन्न सुरक्षा आयुक्त, अन्न व
औषधे प्रशासल, मा. राज्य, मुंबई यांचे अधिसुचना दि. 20 जुलै, 2018 नुसार
प्रतिबंधीत असल्याने श्री. विवेक पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी यांनी सदर साठा
श्री. राजेंद्र बाविस्कर यांचेकडून ताब्यात घेतला. सदरची कारवाई ही सहाय्यक आयुक्त
(अन्न) श्री. यो. कों. बेंडकुळे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. असे
त्यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.
०००
No comments:
Post a Comment