Friday, 14 September 2018

पाचोरा व भडगाव तालुक्यातील पोलीस पाटील पद भरतीसाठी अर्ज करण्यास 19 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ


            जळगाव, दि. 14:- जिल्ह्यातील पाचोरा उपविभागातील उपविभागीय दंडाधिकारी, पाचोरा भाग कार्यालयांतर्गातील गावांत पोलिस पाटील पदभरतीसाठी अर्हताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात फक्त ऑनलाईन पद्धतीनेच www.jalgaonexam.com या संकेतस्थळावर अधिकृत अर्ज मागविण्यात येत आहेत.
             ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात दिनांक 29 ऑगस्ट 2018 रोजी दुपारी 12 वाजेपासून झाली असून  ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत  दिनांक 19 सप्टेंबर 2018 सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत आहे.
            सरळसेवा भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर जाहिरात www.jalgaonexam.com या संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी संपुर्ण माहिती काळजीपूर्वक समजून घेऊनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. प्रस्तुत पदांकरीता केवळ या संकेतस्थळावरुन विहित पद्धतीने भरलेले अर्ज व विहित चलनाद्वारे भरलेले परिक्षा शुल्क ग्राह्य धरण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
            या संकेतस्थळाला भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्यायावत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहिल.
            भरती प्रक्रिया / परिक्षा स्थगित करणे किंवा रद्द करणे अंशत: बदल करणे, पदांच्या एकूण व गाव निहाय संख्येमध्ये वाढ किंवा घट करण्याचे अधिकार तसेच भरतीप्रक्रिये संदर्भात वाद, तक्रारीबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार उपविभागीय  दंडाधिकारी, पाचोरा भाग यांना राहतील व त्यांचा निर्णय अंतिम असेल. असे आवाहन श्री. राजेंद्र कचरे, उपविभागीय दंडाधिकारी पाचोरा भाग, पाचोरा यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.                                      
०००

No comments:

Post a Comment