जळगाव,दि.7:-
राज्याचे
वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. गिरीष महाजन हे जिल्हा दौऱ्यावर
येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
सोमवार दि. 8 ऑक्टोबर, 2018 रोजी सोईनुसार नागपूर
येथून मा. मुख्यमंत्री महोदयांसोबत शासकीय विमानाने जळगावकडे प्रयाण. सोईनुसार
अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 10.00 वाजता मा.
मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली जळगांव जिल्हा आढावा बैठक (स्थळ – नियोजन
भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव), दुपारी 12.30 वाजता मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली
जळगांव जिल्हा कायदा व सुव्यवस्था आढावा बैठक.(स्थळ – नियोजन भवन, जिल्हाधिकारी
कार्यालय,जळगांव), दुपारी 2.00 वाजता मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली
जळगांव महानगरपालीका आढावा बैठक. (स्थळ–नियोजन
भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव) सोईनुसार जळगांव येथून शासकीय विमानाने मा.
मुख्यमंत्री महोदयांसमवेत मुंबईकडे प्रयाण.
००००
No comments:
Post a Comment