जळगाव,
दि. 9 - केंद्र शासनाने राष्ट्रीय खरेदी धोरणातंर्गत खरेदी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात
बदल केले आहेत. शासकीय विभाग, संस्थांकडुन वस्तु व सेवांच्या खरेदीसाठी केंद्र
शासनाने गव्हर्नमेट इ. मार्केटप्लस Gem हे पोर्टल विकसित केले असुन राज्य
शासनाने सर्व शासकीय विभागांना, कार्यालयांना सदर पोर्टलवरुन खरेदी करण्यास
बंधनकारक करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक
यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
यास संदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी,
जळगाव यांचे अध्यक्षतेखाली खरेदी अधिकारी यांचेसाठी Gem पोर्टल संदर्भात कार्यशाळा
आयोजित करण्यात आली आहे. सदरची कार्यशाळा बुधवार, दिनांक 17 ऑक्टोबर, 2018 रोजी सकाळी
11 ते दुपारी 1.00 वाजेपर्यत आणि उत्पादक व पुरवठादार यांचेकरीता त्याचदिवशी
दुपारी 2 ते 5 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, जळगाव येथे आयोजित
करण्यात आलेली आहे.
जळगाव जिल्हयातील जिल्हास्तरावरील सर्व
शासकीय कार्यालय/ विभाग यांचे खातेप्रमुखांनी त्यांचे अधिनस्त संबंधित संगणक
परीचालक/कर्मचारी यांचेसमवेत तसेच उत्पादन व पुरवठादार यांनी त्यांचे औद्योगिक
सल्लागारासह नियोजित दिवशी व वेळी न चुकता हजर रहावे. असे आवाहन साहेबराव पाटील,
महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव यांनी केले आहे.
०००
No comments:
Post a Comment