जळगाव,
दि.14:- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या अधिनस्त
कार्यरत महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. जळगाव यांच्यामार्फत सन
2018-19 या वर्षाकरिता अनुसुचित जाती व नवबौद्ध समाजातील लोकांच्या आर्थिक
विकासासाठी प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. याकरीता अनुसुचित जाती व नवबौद्ध
समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांकडुन विनामुल्य प्रशिक्षणासाठी अर्ज मागविण्यात
येत आहेत.
इच्छुक
उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह दिनांक
26 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी 11 ते सायं 5 वाजता या दरम्यान खालील कागदपत्रांसह
कार्यालयात उपस्थित रहावे.
आवश्यक कागदपत्रे
पासपोर्ट
आकाराचे 2 फोटो, शाळा सोडल्याचा दाखला, मार्कशिट, आधार कार्ड/ पॅन कार्ड/ मतदान
कार्ड/ रेशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, अर्जदार कमीत कमी 10 वी पास
असावा. असे के. व्ही. लोहकरे, जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास
महामंडळ, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
०००
No comments:
Post a Comment