Tuesday, 13 November 2018

भडगाव दुय्यम कारागृह येथे अन्न व पाणी पुरवठ्यासाठी 5 डिसेंबर पर्यत निविदा पाठवाव्यात

    जळगाव, दि. 13 - भडगाव दुय्यम कारागृहातील वर्ग 2 च्या कैद्यांना दि. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर, 2019 या कालावधीसाठी शिजवून तयार केलेले अन्न तसेच पिण्यासाठी व स्नानासाठी दोन वेळा पाणी पुरवठ्याचा मक्ता द्यावयाचा आहे.
     त्याकरिता सिलबंद निविदा मागविण्यात आल्या असून या निविदा दि. 5 डिसेंबर, 2018 पावेतो तहसिल कार्यालय, भडगाव येथे पोहचतील अशा बेताने टपालाने अगर समक्ष सादर कराव्यात. मुदतीनंतर आलेल्या निविदांचा विचार केला जाणार नाही. अधिक माहितीसाठी अधिक्षक, दुय्यम कारागृह, भडगाव येथे संपर्क साधावा. असे आवाहन अधिक्षक, दुय्यम कारागृह, भडगाव यांनी केलेआहे.
                                                                        ०००

No comments:

Post a Comment