जळगाव, दि. 29 - शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पाचोरा येथे पुढील पदांकरीता अत्यंत तात्पुरत्या स्वरुपात तासिका तत्वावर पदे भरण्यात येणार आहेत. अशी माहिती प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पाचोरा, जि. जळगाव यांनी दिली आहे.
शिल्पनिदेशक-संधाता या पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक अर्हता बी. ई/डिप्लोमा/ आय.टी.आय.एनसीव्हीटी/ सीटीआय उत्तीर्ण असावी. गणित/अभि. चित्रकला निदेशक या पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक अर्हता बी.ई/ डिप्लोमा/ आय.टी.आय.एनसीव्हीटी/सीटीआय उत्तीर्ण असावी. एम्पलॉयबिलीटी स्किल या पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता एस.बी.ए/बी.बी.ए/कोणत्याही शाखेचा पदवीधर असावी. या सर्व पदांसाठी प्रत्येकी एक पदसंख्या उपलब्ध आहे.
तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी 7 डिसेंबर, 2018 रोजी सकाळी 11 वाजता अर्ज व सर्व मुळ कागद पत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे. असे आवाहन प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पाचोरा यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००

No comments:
Post a Comment