Saturday, 1 December 2018

गोशाळा चालविणारे व धार्मिक संस्थाचे विश्वस्तांची 3 डिसेंबर रोजी बैठक


        जळगाव, दि. 1- धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे आदेशानुसार जिल्ह्यातील गरीब शेतक-यांच्या व इतरांच्या पशुधनासाठी चारा छावण्या उभारण्यासाठी तसेच गरीबासांठी अन्नछत्र सुरु करण्याबाबत विचार विनिमय करण्यासाठी धर्मादाय उप आयुक्त, जळगाव विभाग यांच्या कार्यालयात सोमवार, ३ डिसेंबर, २०१८ रोजी सकाळी ११.०० वा. बैठक आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती ग. श्री. जोशी यांनी दिली आहे.
            जिल्ह्यातील गोशाळा चालविणारे न्यासाचे विश्वस्त व धार्मिक न्यासाचे विश्वस्तांनी दिनांक ३ डिसेंबर, २०१८ रोजी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, गणेश कॉलनी रोड, जळगाव येथे उपस्थित रहावे. असे आवाहन श्री. जोशी, धर्मादाय उप आयुक्त, जळगाव विभाग, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
000

No comments:

Post a Comment