जळगाव, दि. 17 - अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील नामांकीत
इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये इयत्ता 1 ली व इयत्ता 2 रीच्या वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना
सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात प्रवेश देण्याची योजना आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात
येत आहे. अशी माहिती आर. बी. हिवाळे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास
प्रकल्प, यावल यांनी दिली आहे.
सदर
योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत. या योजनेचा लाभ घेऊ
इच्छिणारा विद्यार्थी अनुसुचित जमातीचा असावा. विद्यार्थ्याच्या किवा पालकांचे
नांवे सक्षम अधिका-याने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत
सादर करावी. दारिद्र्य रेषेखालील असल्यास यादीतील अनुक्रमांक नमुद असलेला
ग्रामसेवकाचा दाखला, पालकाच्या कुटूंबाची वार्षिक उत्पन्नाची कमला मर्यादा रु. एक
लाख या मर्यादेत असावी. इयत्ता 1 ली साठी प्रवेश घेणा-या विद्यार्थ्याचे वय 30
सप्टेंबर, 2019 रोजी 6 वर्षे पूर्ण असावे. त्याचा जन्म 1 ऑक्टोंबर, 2012 ते 30 सप्टेंबर,
2013 दरम्यान झालेला असावा. इयत्ता दुसरी च्या वर्गात प्रवेशासाठी सदर विद्यार्थी
सन 2018-19 या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता 1 ली मध्ये शाळेत प्रवेशित असल्याबाबतचे
बोनाफाईड अर्जासोबत जोडावे. विद्यार्थांचे आधार कार्ड आवश्यक आहे. तसेच
विद्यार्थ्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र, विद्यार्थ्याचे पालक शासकीय / निमशासकीय
नोकरदार नसावेत.
या
योजनेअंतर्गत ज्या पालकांना आपल्या पाल्यास इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत
इयत्ता 1 ली च्या वर्गात प्रवेश घ्यावयाचा आहे. त्यांनी प्रवेश अर्जासाठी प्रकल्प
अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल, जि. जळगाव येथे प्रत्यक्ष पाल्याचा
जन्म दाखला व आधार कार्ड सांक्षाकित प्रत सादर केल्या नंतर प्रवेश अर्ज विनामुल्य 17
डिसेंबर, 2018 ते 28 फेब्रुवारी, 2019 या कालावधीत वाटप केले जाणार आहे. सदरचा
परिपर्णू अर्ज भरुन 5 मार्च, 2019 पूर्वी अर्ज सादर करावा.
इयत्ता
1 ली व 2 री च्या प्रवेशासाठी कागदपत्र पडताळणीसाठी चोपडा, अमळनेर, एरंडोल,
धरणगाव, जळगाव तालुक्यातील पालकांनी व
पाल्यांनी दिनांक 15 मार्च, 2019 रोजी बालमोहन विद्यालय, चोपडा शिव कॉलनी, शिरपूर
रोड, चोपडा येथे उपस्थित रहावे. तर रावेर,
यावल, मुक्ताईनगर, जामनेर, बोदवड, भुसावळ, चाळीसगाव, पाचोरा, भडगाव तालुक्यामधील
पालकांनी व पाल्यांनी शासकीय आश्रमशाळा, डोगरकठोरा ता. यावल येथे उपस्थित रहावे.
असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल, यांनी एका
प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००
No comments:
Post a Comment