जळगाव,
दि. 23 - भारत निवडणूक आयोग यांनी 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस
म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने दरवर्षी जिल्हास्तर,
विधानसभा मतदार संघ स्तर व मतदान केंद्र स्तरावर राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला
जातो. यावर्षीचा जिल्हास्तरीय राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रम पाचोरा विधानसभा
मतदार संघ स्तरावर साजरा करण्यात येणार आहे.
जिल्हास्तरीय राष्ट्रीय
मतदार दिवस कार्यक्रम दिनांक 25 जानेवारी, 2019 रोजी जिल्हाधिकारी किशोर राजे
निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली एस.एस.एम.एम. कॉलेज, पाचोरा येथे सकाळी 10 वाजता
आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास नागरीकांनी मोठया संख्यने उपस्थित रहावे.
असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी 18 पाचोरा विधानसभा मतदार संघ यांनी एका प्रसिध्दी
पत्रकान्वये केले आहे.
०००
No comments:
Post a Comment