Saturday, 19 January 2019

दुचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी क्रमांक मालिका


         जळगाव दि.19 - उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहनेतर संवर्गातील दुचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी एमएच 19/डीजे-0001 ते 9999 पर्यंतची मालिका 29 जानेवारी 2019 पासून सुरु करण्यात येत आहे. ज्या वाहनधारकांना आपल्या वाहनांसाठी आकर्षक व पसंतीचा नोंदणी क्रमांक हवा असेल त्या दुचाकी वाहन धारकांनी 24 व 25 जानेवारी, 2019  या दोन दिवसात आपले  अर्ज  दुपारी चार वाजेपर्यंत उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे सादर करावेत.
            अर्जासोबत शासकीय शुल्काचा धनाकर्ष उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांच्या नावे असलेला धनाकर्ष (Demand Draff)  तसेच ओळखपत्र जमा करून सादर करून  आपल्या पसंतीचा क्रमांक प्राप्त करुन घ्यावा. पसंतीच्या क्रमांकाचे शुल्क भरल्यानंतर तीस दिवसांच्या आत वाहन नोंदणी करुन कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. तीस दिवसात वाहन नोंदणी न झाल्यास भरलेले शुल्क हस्तांतरीत वा परतावा होणार नाही. याची संबंधितांनी नोंद घ्यावी तसेच  एकापेक्षा जास्त अर्ज असलेल्या क्रमांकाबाबत  28 जानेवारी, 2019 रोजी वाढीव शुल्काचा धनाकर्ष सायंकाळी चार वाजेपर्यंत जमा करणे आवश्यक राहील. तरी आकर्षक तथा पसंती क्रमांक घेवू ईच्छिणाऱ्या दुचाकी वाहन धारकांनी या संधिचा लाभ घ्यावा. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव श्री. जयंत पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
०००

No comments:

Post a Comment