Saturday, 30 March 2019

पाळीव प्राणी दुकाने आणि विपणन केंद्रांची नोंदणी बंधनकारक

जळगाव, दि. 30 - केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील पाळीव प्राणी दुकाने आणि श्वानप्रजनन व विपणन केंद्रांची नोंदणी महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाकडे करणे बंधनकारक आहे. अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जळगाव यांनी दिली आहे.
  या अनुषंगाने जिल्ह्यातील व्यावसायिकांना कळविण्यांत येते की, पाळीव प्राणी दुकान नियम, 2018 आणि श्वानप्रजनन व विपणन नियम,2017 अन्वये व्यक्ती/संस्थाची नोंदणी महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाकडे करणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यामुळे संबंधितांनी याबाबतचा परिपूर्ण अर्ज राज्यस्तरीय कार्यक्षेत्रातील संस्थेकडे करण्यात यावा. प्राप्त अर्ज महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाकडे शहानिशा करुन जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीच्या शिफारशीसह पाठविण्यात येणार आहे.
तरी याबाबत संबंधित व्यक्ती/संस्थेने अर्ज प्राधिकरणाकडे सादर करावे. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, जळगांव यांनी केले आहे.
                                                                       0000

No comments:

Post a Comment