Wednesday, 27 March 2019

लोकसभा निवडणूकीसाठी स्थायी निगराणी व फिरत्या पथकांच्या नियुक्त्या निवडणूक कालावधीत पथक प्रमुखांना विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांचे अधिकार


          जळगाव, दि. 27 - लोकसभा निवडणूकीतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी विधानसभा मतदारसंघ निहाय स्थायी निगरानी पथक
(Static Surveillance Team) फिरते पथकांची (Flying Squad) नियुक्ती केली आहे. निवडणूक कालावधीत पथक प्रमुखांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून घोषित करण्यात आले असून त्यांना ते अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.
सहायक निवडणूक निर्णय अधिकारी    
            जिल्हादंडिाधिकारी डॉ. ढाकणे यांनी जळगांव ग्रामीण विधानसभा मतदार संघासाठी श्री राजेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी भुसंपादन, अपर तापी प्रकल्प, हतनूर, चोपडा विधानसभा मतदार संघासाठी श्रीमती शुभांगी भारदे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन), जामनेर विधानसभा मतदार संघासाठी श्री प्रसाद मते, उपजिल्हाधिकारी (रोहयो) मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघासाठी श्री सुनिल सुर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी जळगांव, यांना सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून घोषित केले आहे.
स्थायी निगरानी पथक (Static Surveillance Team)
             तसेच विधानसभा मतदार संघनिहाय स्थायी निगरानी पथक (Static Surveillance Team) ची नियुक्ती केली आहे. ते पुढीलप्रमाणे. 10-चोपडा विधानसभा मतदार संघासाठी श्री. सुभाष सुकलाल वरडे, कक्ष अधिकारी, पं स चोपडा, श्री दिलीप देवसिंग सोनवणे, अधिक्षक, पं स, चोपडा, श्री भाऊसाहेब एम देशमुख, सहायक कर अधिक्षक, 11-रावेरसाठी नवाज रमजान तडवी, शिक्षणाधिकारी, निरंतर, श्री प्रसादकुमार व्ही काटे, कनिष्ठ अभियंता, जिप लघु पाटबंधारे विभाग, श्री रत्नाकर ए चौधरी, पंचायत समिती, यावल, 12-भुसावळसाठी श्री. एम आर. दुसाने, अ का, श्री एम पी सपकाळे, अ का, श्री. एम. बी सपकाळे, अ का, 13-जळगांव शहरसाठी श्री समाधान मधुकर पाटील, राज्य विक्रीकर निरीक्षक, श्री बाळकृष्ण फुला खैरनार, राज्य विक्रीकर निरीक्षक, श्री अंबादास बाळकृष्ण पाटील, मृदा व जलसंधारण विभाग, 14-जळगांव ग्रामिणसाठी श्री जी  बी  बि-हाडे, श्री शिवाजी उत्तमराव नलभे, राज्य विक्रीकर अधिकारी, श्री शैलेष  सुधाकर हिवाळे, राज्य विक्रीकर अधिकारी, 15-अमळनेर साठी श्री आर पी  साळुंखे, अ का, श्री एन जी पाटील, श्री एस आर बोरसे, अ का, 16-एरंडोल साठी श्री एम के नंदनवार, अ. का, श्री एस पी पवार, श्री एस एस पाटील, 17-चाळीसगांवसाठी श्री अरविंद जगन्नाथ येवले, तालुका कृषी अधिकारी, श्री शिवदास रेखा चव्हाण, तालुका कृषी अधिकारी, श्री एस व्ही सुर्यवंशी, अधिक्षक कृषी कार्यालय, चाळीसगांव, 18-पाचोरासाठी श्री राजेंद्र शाहूराव धस, निरंतर अधिकारी, श्री विष्णूकुमार राठोड अ का, श्री किशोर महाले, अ का, 19-जामनेरसाठी श्री डी एम कोळी,  अ का, श्री एस आर कुंभार, अ का, श्री एन ए शेख, अ का, 20-मुक्ताईनगरसाठी श्री दिपक ओतारी, अ का, श्री एम एस भावसार अ का, श्री एम एस पाटील, मंडळ अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
फिरते पथक (Flying Squad)
            त्याचबरोबर जिल्ह्यात फिरते पथकांची (Flying Squad) नियुक्ती करण्यात आली आहे. ती पुढीलप्रमाणे. 10-चोपडासाठी श्री सतीष दगडू कोळी, विस्तार अधिकारी, श्री जितेंद्र पुंडलीक पाटील, विस्तार अधिकारी, श्री दिलीप गोपाल पाटील, तालुका कृषी निरीक्षक यावल, 11-रावेरसाठी श्री ज्ञानदेव वेडू निले, अधिक्षक बीडीओ कार्यालय रावेर, श्री मनोहर फकिरा पाटील, कृषी निरीक्षक, श्री शैलेष तरसोदे, अ का, 12-भुसावळसाठी श्री डी एस चव्हाण,क्राफ्ट इन्सपेक्टर, आयटीआय, श्री डी पी सपकाळे, नायब तहसिलदार, श्रीमती योगीता पाटील, मंडळ अधिकारी, 13-जळगांव शहरसाठी श्री रमेश रामू पाटील, राज्य कर अधिकारी, श्री सुभाष हिम्मत पाटील, राज्य कर अधिकारी, श्री सचिन दशरथराव ऐतलवाड, सहायक अभियंता, सा. बां. विभाग, जळगांव, 14-जळगांव ग्रामीणसाठी श्री गुलाबराव एम पाटील, सेक्शनल अभियंता, श्री मुक्तार गफुर तडवी, मंडळ अधिकारी, श्री दिनेश नानासाहेब उगले, मंडळ अधिकारी, 15-अमळनेरसाठी श्री डी एम वाडीले, नायब तहसिदार, श्री के एम जोशी, नायब तहसिलदार, श्री आर आर ढोले, नायब तहसिलदार, 16-एरंडोलसाठी श्री एम एम सोनार, नायब तहसिलदार, श्री एन झेड वंजारी, नायब तहसिलदार, श्री विजय भानुदास येवले अ का, 17-चाळीसगांवसाठी श्री रालेभट संग्राम महादेव, पंस, चाळीसगांव, श्री डिगंबर दिनकर शिरके, पं स, चाळीसगांव,श्री सुकदेव गोरख जाधव, पंस, चाळीसगांव, 18-पाचोरासाठी श्री रामचंद्र ताराचंद सैंदाणे, निरंतर अधिकारी, श्री मेघ श्याम गुलाबराव चौधरी, निरंतर अधिकारी, श्री महेंद्र निंबाजी पाटील, मंडळ अधिकारी, 19-जामनेरसाठी श्री डी एस लोखंडे, निरंतर अधिकारी, श्री आर एन चव्हाण, निरंतर अधिकारी, श्री व्ही व्ही बैसाणे, वरिष्ट सहायक, 20-मुक्ताईनगरसाठी श्री आर ए तडवी, श्री पी एन महाजन, श्री संजय इंगळे यांची नियक्ती करण्यात आली आहे.
            या अधिकाऱ्यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 129,133,143, व 144 मध्ये दिलेल्या निर्देशानुसार आवश्यक ती कार्यवाही करावी. असे जिल्हादंडाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                         000

No comments:

Post a Comment