जळगाव,
दि. 20 - जिल्ह्यातील 03-जळगाव व 04-रावेर लोकसभा मतदार संघासाठी येत्या 23 एप्रिल
रोजी मतदान होणार असून या दोन्ही मतदार संघातील मतदारांना मतदान करता यावे. यासाठी
शासनाने मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहिर केली आहे.
या दोन्ही मतदार संघातील जे मतदार
कामासाठी मतदार संघाच्या बाहेर असतील त्यांना देखील सुट्टी लागू राहणार आहे. सदरची
सुट्टी ही राज्य शासन, केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक
उपक्रम व इतर प्रतिष्ठान यांनाही लागू राहील. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक
अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment