जळगाव,
दि. 21 - जिल्ह्यातील 03-जळगाव व
04-रावेर या दोन्ही लोकसभा मतदार संघाची मतमोजणी गुरुवार, दिनांक 23 मे, 2019 रोजी
सकाळी 8.00 वाजता महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचा गोदाम क्रमांक 16 व 17,
एमआयडीसी एरिया, जळगाव येथे होणार आहे.
मतमोजणी बाबतची माहिती तसेच तक्रारीसाठी 1950 या टोल फ्री क्रमाकांवर सुविधा उपलब्ध
करुन देण्यात आलेली आहे.
जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील सर्व उमेदवार, निवडणूक
प्रतिनिधी, मतमोजणी प्रतिनिधी व राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी याबाबत नोंद
घ्यावी. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी एका
प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००
No comments:
Post a Comment