जळगाव, दि. 12 - जिल्हा कौशल्य विकास
रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांच्यावतीने शुक्रवार, 13 सप्टेंबर,
2019 रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव येथील मेस हॉलमध्ये सकाळी 10
वाजता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी खाजगी
आस्थापनांनी त्यांचेकडील एकूण 220 रिक्तपदांची मागणी केली आहे.
या रोजगार मेळाव्याच्या
दिवशी नवकिसान बायो प्लॉनटेक, जळगाव, कोजेन्ट लि. बडोदा, डाटा मेर्टीक गोबल
सर्व्हिसेस, नाशिक, युरेका फोर्स, जळगाव, नवभारत फर्टीलायझर, औरंगाबाद आदि कंपनीचे
अधिकारी नियोक्त्यांकडून देण्यात येणाऱ्या वेतनाबाबत तसेच इतर सवलतींबाबत माहिती
देणार आहेत.
या रोजगार मेळाव्यास 10
वी पास, 12 वी पास, आय.टी.आय, पदवीधर इत्यादी पात्र विद्यार्थ्यांना उपस्थित राहता
येईल. रोजगार मेळाव्यात उद्योजकास विविध रिक्तपदांसाठी पात्र उमेदवारांची निवड
करावयाची असल्याने या मेळाव्यास उमेदवारांनी स्वखर्चाने शैक्षणिक पात्रतेची
प्रमाणपत्रे, बायोडाटा, पासपोर्ट फोटो इत्यादीसह उपस्थित रहावे. असे आवाहन श्रीमती
अ. ला. तडवी, सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन
केन्द्र, जळगाव यांनी एका पत्रकान्वये केले आहे.
0000
No comments:
Post a Comment