जळगाव,
दि. 31 - भारताच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच
लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने या नेत्यांना जिल्हा
प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ.
अविनाश ढाकणे यांनी दोघांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) तुकाराम हुलवळे,
उपजिल्हाधिकारी पुनर्वसन श्रीमती शुभांगी भारदे, जिल्हा विज्ञान व सुचना अधिकारी
प्रमोद बोरोले, महेश पत्की, तहसिलदार प्रशांत कुलकर्णी, जिल्हाधिकारी कार्यालयातील
अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी
जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी सर्व उपस्थितांना राष्ट्रीय एकता
दिवसानिमित्ताने राष्ट्राची एकता, अखंडता व सुरक्षेची शपथ दिली.
000
No comments:
Post a Comment