जळगाव, दि.4- राज्यात कृषि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषी उत्पादन आणि उत्पन्न वाढीसाठी योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा आणि कृषि विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्यक्ती/संस्था/गट यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषीभूषण, जिजामाता कृषीभूषण, सेंद्रीय शेती कृषीभूषण, वसंराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, पीकस्पर्धा विजेते, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येते.
सन 2019 करिता पुरस्कारासाठी जिल्ह्यातील शेती क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या इच्छूक शेतकऱ्यांनी आपले प्रस्ताव आपल्या तालुक्याच्या पंचायत समितीच्या कृषि अधिकाऱ्यांकडे सादर करावेत. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
000

No comments:
Post a Comment