जळगाव.दि.22 :- भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा रामोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या असमान निधी योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगिण विकासासाठी अर्थ सहाय्याच्या विविध योजना राबविण्यात येतात. सन 2019-20 पासुन असमान निधी योजनांसाठीचे विविध प्रस्ताव www.rrrlf.gov.in या
प्रतिष्ठानच्या संकेतस्थळाद्वारे Online पद्धतीने सादर करण्याबाबत प्रतिष्ठानकडून निदेश देण्यात आलेले आहेत.
या योजनांसाठी करावयाचा अर्ज :-
असमान निधी योजना या खिडकीखाली देण्यात आलेल्या User guide for applying online assistance यावर सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यात आले आहे. मार्गदर्शक सुचनांनुसार इच्छुक शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी आवश्यक असलेल्या असमान निधी योजनेचे प्रस्ताव संकेतस्थळावरून उपलब्ध (downlode) करून दिलेल्या सुचनांनुसार Online पद्धतीने दि. 07 डिसेंबर 2019 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत अपलोड करावेत.
तसेच सदर अर्जांची प्रिंट काढून अपलोड केलेल्या आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव चार प्रतित आजल्या जिल्ह्याच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास 11 डिसेंबर 2019 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत सादर करावेत. योजनेचा लाभ राज्यातील इच्छुक शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना घेता येईल.
असमान निधी योजना सन 2019-20 साठी (Non Matching Schemes )
ग्रंथालय सेवा देण्याऱ्या स्वयंसेवी संस्थांना
ग्रंथ, साधन सामग्री, फर्निचर,
इमारत बांधकाम व इमारत विस्तार यासाठी असमान निधीतून अर्थसहाय्य, "राजा
राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा" विकसित
करण्यासाठी अर्थसहाय्य, महोत्सवी वर्ष जसे 50/60/75/100/125/150 वर्ष
साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य,
राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा प्रशिक्षण
वर्ग व जागरूक्ता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय्य. बाल
ग्रंथालय व राजाराम मोहन रॉय ग्रंथालय बाल कोपरा स्थापन करण्यासाठी अर्थसहाय्य. राजाराम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनांबाबत इच्छुकांनी अधिक माहितीस्तव आपल्या जिल्ह्यातील जिल्हा
ग्रंथालय अधिकारी कार्यालयांशी संपर्क साधावा तसेच प्रतिष्ठानचे www.rrrlf.gov.in हे संकेतस्थळ पहावे. उपरोक्त योजनेचा लाभ घेण्यासाठी सादर करण्यात येणाऱ्या अर्ज हा Online पध्दतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रे अपलोड करून इंग्रजी / हिंदी भाषेत भरावा. असे आवाहन ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई, श्री. सुभाष हि.
राठोड यांनी राज्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
00000
No comments:
Post a Comment