जळगाव, दि. 10 -
महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) रामुजी पवार
हे 11 ते 21 डिसेंबर, 2019 दरम्यान जळगाव
जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
बुधवार, 11 डिसेंबर रोजी सकाळी 11.00 वाजता मुंबई येथून
चाळीसगावकडे प्रयाण सायंकाळी 5.00 वाजता चाळीसगाव शासकीय विश्रामगृह येथे आगमन व
मुक्काम.
गुरूवार 12 डिसेंबर रोजी सकाळी 11.00 वाजता चाळीसगाव
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांचे समवेत सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत बैठक.
दुपारी 1.00 ते 2.00 वाजेदरम्यान राखीव. दुपारी 2.00 वाजता चाळीसगाव येथून
भडगावकडे प्रयाण. दुपारी 3.00 वाजता मुख्याधिकारी, भडगाव नगरपरिषद यांचे समवेत
सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत बैठक. सायंकाळी 5.00 वाजता भडगाव येथून
पाचोऱ्याकडे प्रयाण. सायंकाळी 6.00 वाजता शासकीय विश्रामगृह, पाचोरा येथे आगमन व
मुक्काम.
शुक्रवार 13 डिसेंबर रोजी सकाळी 11.00 वाजता पाचोरा
नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांसमवेत सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत बैठक. दुपारी
1.00 ते 2.00 राखीव. दुपरी 2.00 वाजता पाचोरा येथून एरंडोलकडे प्रयाण. दुपारी 3.00
वाजता एरंडोल नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांसमवेत सफाई कर्मचाऱ्यांच्या
समस्यांबाबत बैठक. सायंकाळी 7.00 वाजता शासकीय विश्रामगृह, जामनेर येथे आगमन व
मुक्काम.
सोमवार 16 डिसेंबर रोजी सकाळी 9.00 वाजता जामनेर येथून
पारोळाकडे प्रयाण सकाळी 11.00 वाजता पारोळा नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांसमवेत
सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत बैठक. दुपारी 1.00 ते 2.00 वाजेदरम्यान राखीव.
दुपारी 2.00 वाजता पारोळा येथून अमळनेरकडे प्रयाण. दुपारी 3.00 वाजता अमळनेर
नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांसमवेत सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत बैठक.
सायंकाळी 6.00 वाजता शासकीय विश्रामगृह, अमळनेर येथे आगमन व राखीव.
मंगळवार 17 डिसेंबर रोजी सकाळी 10.00 वाजता अमळनेर येथून
धरणागावकडे प्रयाण. सकाळी 11.00 वाजता धरणगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांसमवेत
सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत बैठक. दुपारी 12.30 ते 1.30 दरम्यान राखीव.
दुपारी 1.30 वाजता धरणगाव येथून चोपडाकडे प्रयाण. दुपारी 3.00 चोपडा नगरपरिषदेच्या
मुख्याधिकाऱ्यांसमवेत सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत बैठक. सायंकाळी 6.00 वाजता
शासकीय विश्रामगृह, चोपडा येथे आगमन व मुक्काम.
बुधवार 18 डिसेंबर रोजी सकाळी 10.00 वाजता चोपडा येथून
यावलकडे प्रयाण. सकाळी 11.00 वाजता यावल नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांसमवेत सफाई
कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत बैठक. दुपारी 1.00 ते 2.00 वाजेदरम्यान राखीव. दुपारी
2.00 वाजता यावल येथून फैजपूरकडे प्रयाण. दुपारी 3.00 वाजता फैजपुर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांसमवेत
सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत बैठक. सायंकाळी 5.00 वाजता फैजपुर येथून
रावेरकडे प्रयाण. सायंकाळी 6.00 वाजता शासकीय विश्रामगृह, रावेर येथे आगमन व
मुक्काम.
गुरूवार 19 डिसेंबर रोजी सकाळी 11.00 वाजता रावेर
नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांसमवेत सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत बैठक.
दुपारी 1.00 ते 2.00 वाजेदरम्यान राखीव. दुपारी 2.00 वाजता रावेर येथून सावदाकडे
प्रयाण. दुपारी 3.00 वाजता सावदा नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांसमवेत सफाई
कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत बैठक. सायंकाळी 5.00 वाजता सावदा येथून जामनेरकडे
प्रयाण. सायंकाळी 6.30 वाजता शासकीय विश्रामगृह, जामनेर येथे आगमन व मुक्काम.
शुक्रवार 20 डिसेंबर रोजी सकाळी 10.00 वाजता जामनेर येथून
वरणगावकडे प्रयाण. सकाळी 11.00 वाजता वरणगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांसमवेत
सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत बैठक. दुपारी 1.00 ते 2.00 वाजेदरम्यान राखीव.
दुपारी 2.00 वाजता वरणगाव येथून जामनेरकडे प्रयाण. दुपारी 3.00 वाजता जामनेर
मुख्याधिकाऱ्यांसमवेत सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत बैठक. सायंकाळी 6.00 वाजता
शासकीय विश्रामगृह, जामनेर येथे आगमन व मुक्काम.
शनिवार 21 डिसेंबर रोजी सकाळी 10.00 वाजता जामनेर येथून
दिग्रसकडे प्रयाण.
000
No comments:
Post a Comment