Tuesday, 18 February 2020

मतदार यादीतील आक्षेप किंवा हरकतीसाठी 29 फेब्रुवारी अंतिम मुदत


जळगाव.दि.18:- भारत निवडणूक आयोगाच्या 1 जानेवारी 2020 च्या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनररीक्षण कार्यक्रमांतर्गत 13- जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील  आढळून न आलेले, स्थलांतरीत, मयत, दुबार मतदार तसेच ई पी क नंबर व फोटो नसलेल्या मतदाराची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार असून वगळण्यात आलेल्या मतदारांची यादी jalgon.gov.in या  संकेतस्थळावर प्रसिद्धी करण्यात आलेली आहे.
तरी विशेष संक्षिप्त पुनररीक्षण कार्यक्रमातर्गत अद्ययावत करण्यात आलेल्या यादीचे अवलोकन केल्यानंतर कोणाला यादीबद्दल हरकत किंवा आक्षेप असल्यास त्यांनी आपली तक्रार 29 फेब्रुवारी 2020 पर्यंत  नायब तहसिलदार तहसिल कार्यालय,जळगाव देवेंद्र चंदनकर यांचेकडे दाखल करावी. असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा नोंदणी अधिकारी 13-जळगाव शहर मतदारसंघ, जळगाव दिपमाला चौरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                      00000                                                  

No comments:

Post a Comment