Monday, 6 July 2020

जुलै महिन्याचा विभागीय लोकशाही दिन रद्द


            जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 6 - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या 29 जून, 2020 रोजीच्या आदेशान्वये शासनाने संपूर्ण राज्यात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन घोषित केलेला आहे. त्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे होणारा माहे जुलै महिन्याचा विभागीय लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे. असे उपायुक्त, (महसूल) दिलीप स्वामी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
            नागरीकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. शासनाच्या आदेशानुसार कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक आहे. त्यानुसार माहे जुलै महिन्याचा विभागीय लोकशाही दिन रद्द करण्यात आल्याचे उपायुक्त, (महसूल) दिलीप स्वामी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
00000

No comments:

Post a Comment