Wednesday, 19 August 2020

कौशल्य विकास विभागाकडे ऑनलाईन नावनोंदणी केलेल्या उमेदवारांनी आधार व मोबाईल क्रमांक जोडणे अनिवार्य

        जळगाव, (जिमाका) दि. 19 - जिल्ह्यातील उमेदवारांची ऑनलाईन नांवनोंदणी सन 2013 पासून कौशल्य विकास विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर सुरु झालेली आहे. उमेदवार विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन नावनोंदणी करीतच आहेत. उमेदवारांनी ऑनलाईन नांवनोंदणी केल्यानंतर उमेदवारांना मिळालेल्या युझर आयडी व पासवर्डच्या अनुशंगाने विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या सुविधांचा आणि माहितीचा उमेदवारांना लाभ घेता येतो.

            तथापी, असे निदर्शनास आले आहे की, अद्यापही ऑनलाईन नांवनोंदणी केलेल्या ब-याचशा उमेदवारांनी त्यांचे आधार क्रमांक प्रोफाईलमध्ये नमूद केलेला नाही. तसेच आधारक्रमांकाला जोडलेला (लिंक केलेला) मोबाईल क्रमांकही नमूद केलेला नाही. त्यामुळे अशा उमेदवारांना विभागाच्या संकेतस्थळाचा उपयोग करतांना अडचणी निर्माण होतात.

            तरी नावनोंदणी केलेल्या उमेदवारांनी आधार व प्रोफाईल विभागाच्या www.mahaswayam.gov.in या  संकेतस्थळावर तात्काळ अपडेट न केल्यास आपली नोंदणी 31 ऑगस्ट, 2020 अखेर रद्द होईल. याबाबत काही अडचणी असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सकाळी 9.45 ते संध्या 6.15) या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 0257-2239605 वर संपर्क साधावा, असे श्रीमती अनिसा तडवी, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment