जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि.19:- राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा जिल्हा दौरा पुढील प्रमाणे..
शुक्रवार 20 नोव्हेंबर, 2020 रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत पाळधी, ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 10 वा. 30 मि.नी वराड, ता. धरणगाव येथे सदिच्छा भेट. सकाळी 11 वाजता जळगाव येथे जिल्हा उद्योग केंद्र यांची आढावा बैठक स्थळ- अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव. दुपारी 12 वाजता गिरणा कालवा सल्लागार समिती बैठक स्थळ- अजिंठा शासकीय विश्रामगृह जळगाव. दुपारी 1 वाजता पाळधी, तालुका धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 4 वाजता यावलकडे प्रयाण. सायं 5 वा. यावल येथे शिवसेना मेळाव्यास उपस्थिती. स्थळ- कृषी उत्पन्न बाजार समिती यावल, सायं 6 वाजता बोरवल ता यावल येथे विकासकामांचे भूमीपूजन सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. सोईनुसार पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
**
No comments:
Post a Comment