Wednesday, 10 February 2021

जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. जयंत पाटील यांचा सुधारीत जिल्हा दौरा

             जळगाव, (जिमाका) दि. 10 - राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री ना. जयंत पाटील हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दि. 11 व 12 फेबुवारी,2021 चा सुधारीत दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

            गुरुवार, दि. 11 फेब्रुवारी, 2021 रोजी सकाळी 10.45 वा. शिरपुर येथून पाडळसरे, ता. अमळनेर, जि. जळगावकडे प्रयाण,  सकाळी 11.30 ते 12.00 वाजेपर्यंत पाडळसरे, ता.अमळनेर येथे आगमन व निम्न तापी प्रकल्प भेट व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यासमवेत चर्चा, दुपारी 12.00 वाजता मोटारीने अमळनेरकडे प्रयाण, दुपारी 12.15 ते  1.00 वाजता अमळनेर विधानसभा मतदार संघ आढावा बैठक, दुपारी 1.00 ते 2.00 वाजता अमळनेर रोथे राष्ट्रवादी परीवार संवाद, दुपारी 2.00 ते 3.00 वाजेपर्यंत राखीव. दुपारी  3.00 वाजता मोटारीने अमळनेर येथून पारोळाकडे प्रयाण,  दुपारी  3.30 वाजता पारोळा येथे आगमन. दुपारी 3.30 ते 4.15 वाजेपर्यंत एरंडोल विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक.  दुपारी 4.15 वाजता मोटारीने पारोळा येथून पाचोराकडे प्रयाण. सायंकाळी 5.30  ते 6.15 वाजेपर्यंत पाचोरा येथे आगमन व पाचोरा विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक. सायंकाळी 6.15 वाजता मोटारीने पाचोरा येथून जामनेरकडे प्रयाण. सायंकाळी 7.30 ते 8.15 वाजेपर्यंत जामनेर येथे आगमन व जामनेर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक. रात्री 8.15 वाजता मोटारीने जामनेर येथून जळगावकडे प्रयाण. रात्री  9.05 वाजता जळगाव येथे आगमन व मुक्काम. 

            शुक्रवार, दि. 12 फेब्रुवारी, 2021 रोजी सकाळी 9.00 वाजता मोटारीने जळगाव येथून चोपडाकडे प्रयाण. सकाळी 10.30 ते 11.30 वाजता चोपडा येथे आगमन व चोपडा येथे नगरपालीका कामांचे उदघाटन. दुपारी 11.30 ते 12.30 वाजता चोपडा विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक.  दुपारी 12.30 ते 1.30 वाजता राखीव. दुपारी 1.30 वाजता  मोटारीने चोपडा येथून फैजपूरकडे प्रयाण. दुपारी 2.30 ते 3.15 वाजता फैजपूर येथे आगमन व रावेर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक. दुपारी 3.15 वाजता मोटारीने फैजपूर येथून भुसावळकडे प्रयाण. सायं 4.30 ते 5.15 वाजता भुसावळ येथे आगमन व भुसावळ विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक. सायं 5.15 वाजता मोटारीने भुसावळ येथून मुक्ताईनगरकडे प्रयाण. सायं 6.00 वाजता मुक्ताईनगर येथे आगमन. सायं 6.00 ते 6.15 वाजता संत मुक्ताई माऊली दर्शन. सायं 6.15 ते 8.00 वाजता मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक. पक्ष कार्यालय उदघाटन व पक्ष प्रवेश कार्यक्रम. सायं 8.00 ते 9.00 वाजता राखीव व मुक्काम  जळगाव.

                                                                            ००००

No comments:

Post a Comment