जळगाव, (जिमाका) दि 11 - भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 74 व्या वर्धापनदिन समारंभानिमित्ताने जिल्हास्तरीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात 15 ऑगस्ट, 2021 रोजी सकाळी 9.05 वाजता राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
कोरोना विषाणूची पार्श्वभूमी लक्षात घेता ध्वजारोहण समारंभास सर्वांसाठी मास्क लावणे आणि सामाजिक अंतर संदर्भातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment