Thursday, 12 August 2021

पालकमंत्री गुलाबराव पाटील शुक्रवारी जिल्हा दौऱ्यावर

      जळगाव, (जिमाका) दि. 12 - राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.         
     गुरुवार दि.12 ऑगस्ट, 2021 रोजी दुपारी 4.00 सीएसएमटी मुंबई रेल्वे स्टेशन येथून राजधानी एक्सप्रेसने जळगावाकडे प्रयाण. रात्री 8.48 वा. जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन व पाळधी, ता. धरणगावकडे शासकीय वाहनाने प्रयाण व राखीव.
            शुक्रवार, दि. 13 ऑगस्ट, 2021 रोजी सकाळी 8.00 वा. पाळधी येथे अभ्यांगत व कार्यकर्त्यांच्या भेटी व चर्चा. सकाळी 9.00 वा. पाळधी, ता. धरणगाव येथून न्हावी ता. यावलकडे प्रयाण. सकाळी 9.45 वा. न्हावी     ता. यावल येथे आगमन व न्हावी येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या कोनशिला अनावरण समारंभास उपस्थिती. सकाळी 11.00 वा. न्हावी ता. यावल येथुन अजिंठा शासकीय विश्रामगृह जळगावकडे प्रयाण. सकाळी 11.30 वा. अजिंठा शासकीय विश्रामगृह जळगाव येथे आगमन व जळगाव जिल्हा जल जीवन मिशनच्या कामांबाबत आढावा बैठक. दुपारी 12.30 वा. अजिंठा शसकीय विश्रामगृह, जळगाव येथे कठोरा, ता. जळगाव येथील गावठाण मंजूरीबाबत बैठक. दुपारी 1.00 वा. अजिंठा विश्रामगृह येथून जांभोरा, ता. धरणगावकडे प्रयाण व जांभोरा, ता. धरणगाव येथील नियोजित कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2.30 वा. जांभोरा ता. धरणगाव येथून पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 4.30 वा. पाळधी, ता. धरणगाव येथून जवखेडा सिम, ता. एरंडोलकडे प्रयाण व तेथील विविध विकास कामांचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 5.00 वा. जवखेडा सिम, ता. एरंडोल येथून कासोदा, ता. एरंडोलकडे प्रयाण व विविध विकास कामांचे भुमीपूजन सोहळ्यास उपस्थिती. सोईनुसार पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
                                                            00000

No comments:

Post a Comment